नाशिक: ‘आरटीओमध्ये नोकरी लावून देतो’ सांगून 24 लाखांची फसवणूक

नाशिक (प्रतिनिधी): आरटीओमध्ये सबइन्स्पेक्टर या पदावर नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून चार भामट्यांनी एका इसमाची सुमारे 24 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की संशयित आरोपी कैलास ठाकूर, छगन अग्रवाल, पवन भुतडा व उज्ज्वला वठारकर यांनी फिर्यादी पुंजाबा नामदेव सोनवणे (रा. समुद्रनगर, सातपूर) यांचा मुलगा याला आर. टी. ओ. मध्ये सबइन्स्पेक्टर या पदावर नोकरी लावून देतो, असे सांगून आरोपींनी त्यांचा विश्‍वास संपादन केला.

हे ही वाचा:  नाशिक: राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत बालकांची तपासणी मोहीम

त्यानंतर या चौघा भामट्यांनी फिर्यादी सोनवणे यांच्याकडून रोख व विविध बँकांच्या खात्यांवर एकूण 24 लाख 20 हजार रुपये घेतले. त्यानंतर फिर्यादीच्या मुलाच्या नावाने आरटीओ कार्यालयामध्ये सबइन्पेक्टर या पदावर निवड झाल्याबाबतची बनावट ऑर्डर व बनावट मेल पाठविले. त्यानंतर ही ऑर्डर बनावट असल्याबाबत, तसेच त्यांनी मेलवरून वैभव सोनवणे याच्या ईमेल आयडीवर महाराष्ट्र आरटीओमध्ये ग्रुप सी सबइन्स्पेक्टर या पदावर सिलेक्शन झाल्याबाबतचा मेल पाठवून चौघांनीही सोनवणे यांच्याशी संगनमत करून फसवणूक केली.

हे ही वाचा:  नाशिक: होळी अन रंगोत्सव साजरा करतांना सावधानता बाळगण्याचे महावितरणचे आवाहन

सोनवणे यांनी आरोपींकडे पैसे परत मागितले असता त्यांनी अद्यापपर्यंत पैसे परत केले नाहीत. हा प्रकार दि. 11 नोव्हेंबर 2020 ते दि. 10 मार्च 2025 दरम्यानच्या कालावधीत घडला. याप्रकरणी चौघा जणांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत. (अंबड पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: १९०/२०२५)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790