नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात मंगळवारी (दि. १५ सप्टेंबर) ८१२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २१४१, एकूण कोरोना रुग्ण:-३८,४०९, एकूण मृत्यू:-६०८ (आजचे मृत्यू ०९), घरी सोडलेले रुग्ण :- ३१,५६७, उपचार घेत असलेले रुग्ण:- ६२३४ अशी संख्या झाली आहे.
नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा…
नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) कालभैरव चौक,हिरे विद्यालयाजवळ, सावता नगर,सिडको,नाशिक येथील ६२ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २) गुरुकृपा भवन, शिवकृपा नगर ,हिरावाडी येथील २६ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे. ३) नाशिकरोड,नाशिक येथील ५५ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ४) टागोर नगर, नाशिक येथील ६५ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. ५) भागचंद कॉम्प्लेक्स, इंद्रकुंड कॉर्नर, पंचवटी,नाशिक येथील ६२ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. ६) योगेश्वरी बंगलो, म्हसरूळ- मखमलाबाद लिंक रोड, पाण्याच्या टाकी जवळ, म्हसरूळ येथील ७३ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ७) अष्टविनायक अपार्टमेंट, अशोकस्तंभ, नाशिक येथील ५५ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ८)स्पेस सुर्या अपार्टमेंट, दत्त मंदिर, नाशिक येथील ६० वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ९) हेरिटेज पार्क,गुलमोहर नगर, महालक्ष्मी मंदिराजवळ, म्हसरूळ नाशिक येथील ५३ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.