Amazon

नाशिक: सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करणाऱ्यास पश्चिम बंगालमधून अटक !

नाशिक (प्रतिनिधी): पंचवटीतील मखमलाबादनाका भागात सोन्याचे दागिने व कलाकुसर बनविण्याचे छोटेसे दुकान टाकणाऱ्या कारागिरानेच परिसरात राहणाऱ्या महिलेचे सुमारे १० तोळे वजनाचे ७ लाखांचे व इतर महिलांचे ३ लाखांचे असे १० लाखांचे सोने लंपास केले होते. या प्रकरणात फरार झालेल्या संशयित अमित भुनिया या कारागिरास गुन्हा शाखेच्या युनिट क्र. १ च्या पथकाने पश्चिम बंगालमधील रबिदासपूर (जि. पश्चिम मेदिनीपूर) येथून ताब्यात घेतले आहे.

🔎 हे वाचलं का?:  सुरगाण्यात ३.३ रिश्टर स्केलचा भूकंप; नाशिक शहरापासून ५३ किलोमीटरवर केंद्रबिंदू

मखमलाबादनाका भागातील खांदवे निवास येथे राहणाऱ्या सौ. संगीता माळवे यांच्या तक्रारीनुसार, पंचवटी पोलिस ठाण्यात ३ फेबुवारीला त्यांच्या घराजवळच सराफी कारागिरी करणाऱ्या संशयित अमित भुनियाने १० तोळे वजनाचे दागिने लांबवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. माळवे यांनी दागिने बनविण्यासाठी कारागीर भुनियाकडे सोने दिले होते. संशयित हा त्यांच्या परिसरातच भाडेतत्त्वावर रहात असल्याने ओळखीचा होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पत्नीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी डॉ. नीलेश जेजुरकर पोलिसांच्या ताब्यात

त्याने त्याचाच गैरफायदा घेत माळवे यांच्यासह आणखी काही महिलांचे दागिने बनविण्यासाठी चोख सोने घेतले आणि तो फरार झाला होता. युनिट एकचे उपनिरीक्षक बागूल, संदीप भांड, प्रवीण वाघमारे यांनी गोपनीय माहिती काढली असता भुनिया हा त्याच्या मूळगावी रबिदासपूर (जि. पश्चिम मेदिनीपूर) येथे गेल्याचे समजले. पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. संशयिताकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790