नाशिक: “मोबाईल नको, पुस्तकच हाती घ्या” – भीमाबाई जोंधळे

‘शिवसेना, सत्कार्य फाउंडेशन’ तर्फे आयोजित गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्यातून प्रबोधन

नाशिक (प्रतिनिधी): “मी प्रत्येक आईला हात जोडून विनंती करते, टीव्ही, मोबाईल वापरावर मर्यादा आणून लेकरांच्या हाती पुस्तकं द्या, घरात छोटंसं वाचनालय उभं करायला विसरू नका. कारण, पुस्तकच माणूस घडवतात”, अशा शब्दांत पुस्तकांची आई भीमाबाई जोंधळे यांनी वाचनाचे महत्त्व सांगितले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनतर्फे उंटवाडीतील जगतापनगर-तिडकेनगरमध्ये गुरुवारी, २० फेब्रुवारी रोजी सद्गुरू श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा मोठ्या भक्तीभावाने संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुण्या भीमाबाई जोंधळे यांनी विचार मांडले. परिस्थितीमुळे पाचवीतच शिक्षण थांबलं. मात्र, वाचनाची आवड कायम राहिली. मला आधार देणार्‍या वृत्तपत्रांना मुलापेक्षाही जास्त जीव लावते, असे सांगून त्यांनी संघर्षाचा काळ तसेच ‘पुस्तकांचं हॉटेल’पर्यंतचा प्रवास उलगडला. वाचनाचं महत्त्व मला कळलं, आज महाराष्ट्र मला पुस्तकांची आई म्हणून ओळखतोय. मुलांच्या मोबाईल वापरावर बंधनं आणून त्यांना वाचनाकडे वळवा, असे कळकळीचे आवाहन त्यांनी महिलांना केले.

👉 हे ही वाचा:  नाशिक: ३० लाखांच्या कपड्याच्या मालाचा अपहार केल्याप्रकरणी दोघांना अटक !

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा आणि मायमराठीवरील कविता सादर केली, तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली. शिवसेना खासदार राजाभाऊ वाजे यांनीही मनोगत व्यक्त केले. आयोजकांचे कौतुक केले. भाविकांच्या समृद्ध जीवनासाठी श्री गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना केली. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते महाआरती झाली. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

यावेळी शिवसेना उपनेते सुनील बागुल, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, डी. जी. सूर्यवंशी, नाना महाले, विठ्ठलराव देवरे, जयप्रकाश अमृतकर, आर. आर. जाधव, भालचंद्र रत्नपारखी, प्रतिभा देशमुख, ओमप्रकाश शर्मा, अशोक देवरे, प्रथमेश गीते, अजय बागुल, मामा राजवाडे, शिवानी पांडे, बाजीराव तिडके, विलास जगताप, संतोष कोठावळे, प्रवीण जोंधळे, शंभू बागुल, नीलेश साळुंखे, सुभाष गायधनी, नाना पाटील, राम पाटील, राजेंद्र क्षीरसागर, राहुल दराडे, सुनील जाधव, कैलास चुंबळे, विवेक पाटील, सुंदर गोविंद वाणी समाज मंडळाचे अध्यक्ष शांताराम भदाण, निंबा अमृतकर, शिवाजी मेने, संदीप गहिवाड, डॉ. प्रताप कोठावळे आदी उपस्थित होते.

👉 हे ही वाचा:  मोठी बातमी! PM धन धान्य कृषी योजनेला कॅबिनेटची मंजुरी; 1.7 कोटी शेतकऱ्यांना होणार लाभ

सूत्रसंचालन यशवंत जाधव, प्रथमेश पाटकर यांनी केले. सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवलताई खैरनार, संगिता देशमुख, वंदना पाटील, रवींद्र सोनजे, प्रभाकर खैरनार, वसंतराव फडके, संजय टकले, विशाल भदाणे आदींनी मान्यवरांचे स्वागत केले.

सोहळा यशस्वीतेसाठी पंढरीनाथ पाटील, विनोद पोळ, दिलीप दिवाणे, दिलीप रौंदळ, नीलेश ठाकूर, अशोक पाटील, भास्कर देसले, सतीश मणिआर, मंदार सडेकर, मनोज वाणी, सुनील सोनकांबळे, आनंदा तिडके, किरण काळे, दीपक दुट्टे, संदीप कासार, परेश येवले, मंदार जोशी, नंदकुमार कुर्‍हाडे, मिलिंद घन, मिलिंद येवला, नीलेश गुजराथी, अजित निकम, मनोहर नेरकर, राहुल ठाकरे, कुमार पवार, दिलीप येवले, शंकर चौधरी, अनंत संगमनेरकर, डॉ. शशिकांत मोरे, डॉ. राजाराम चोपडे, राहुल कदम, प्रतिभा पाटील, उज्ज्वला सोनजे, मीना टकले, मनीषा मिंधे, शुभांगी निकम, छाया चौधरी, ज्योत्स्ना गुजराथी, शुभांगी देशमुख, मनिकर्णिका भंडारे, छाया नवले, ऋचा येवले, गीता येवला, सरला निकम, निता फडके, विद्या पाटील, संगीता रौंदळ, दिपीका ठाकरे, सचिन जाधव, योगेश येवला, भूषण देशमुख, राहुल काळे, राहुल पाटील, वैभव कुलकर्णी, हरिष काळे, तेजस अमृतकर, प्रथमेश पाटील, सरोज रसाळ आदींनी परिश्रम घेतले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790