
नाशिक (प्रतिनिधी): नवीन नाशकात भरदिवसा सोन्याच्या दुकानावर चोरट्यांनी दरोडा पडल्याची घटना सोमवारी (दि. २० फेब्रुवारी) दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास घडली होती. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एका आरोपीस पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. तर उर्वरित दोन आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत.
नाशिक शहरात अंबड पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १७ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारच्या सुमारास श्री. ज्वेलर्स नावाच्या दुकानात तीन अज्ञात इसमांनी घुसून सराफ दुकानदारास बंदुकीचा धाक दाखवुन त्यांच्याकडे असलेल्या सोन्याचे दागिने घेवुन सराफ दुकानादार व त्यांची पत्नी यांच्या चेह-यावर स्प्रे मारून त्याच्या ताब्यातील बुलेट मोटार सायकलवर बसुन पळून गेले होते. त्याबाबत फिर्यादी यांनी अंबड पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारी वरून गुन्हा रजिस्टर क्रमांक: १४०/२०२५ भा.न्या.सं. कलम ३११, ३०९ (४),३३३, ३५१(२), ३(५), २५(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी नाशिक शहर पोलीस गुन्हे शाखा युनिट १ ने घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचे येण्याजाण्याचे मार्ग तपासले होते. या प्रकरणाचा तपास करत असतांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, एक इसम हा विना नंबरप्लेटची बुलेट मोटारसायकल घेऊन सोने विक्री करण्याकरिता सिन्नर फाटा येथे येणार आहे. त्याप्रमाणे गुन्हे शाखा युनिट १ आणि युनिट २ यांचे पथक तयार करून सापळा रचण्यात आला. या सापळ्यात संशयित आरोपी सापडला. यावेळी संशयित निलेश उर्फ शुभम हिरालाल बेलदार (वय: २५, राहणार: फ्लॅट नं: ९, नंदन अपार्टमेंट, दत्त नगर, चुंचाळे, नाशिक) याला पकडून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली बुलेट तसेच सोन्याचे ४४.८५० ग्रॅम सोन्याचे व ८७.८७० ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण ५,४०, २२५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्याने हा गुन्हा त्याच्या इतर दोन साथीदारांच्या सहाय्याने केल्याची कबुली दिली. पोलिसांची पथके आता फरार दोन आरोपींच्या मागावर आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव (गुन्हे), सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड व गुन्हेशाखा युनिट क्रमांक २ चे सहायक पोलीस निरीक्षक: हेमंत तोडकर, महेश हिरे, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार: महेश साळुंके, विशाल काठे, उत्तम पवार, योगीराज गायकवाड, कैलास चव्हाण, रोहिदास लिलके, रविंद्र आढाव, धनंजय शिंदे, पोलीस नाईक: विशाल देवरे, मिलिदसिंग परदेशी, पोलीस अंमलदार: राहुल पालखेडे, विलास चारोस्कर, मुक्तार शेख, आप्पा पानवळ, अमोल कोष्टी, नितीन जगताप, राम बर्डे, जगेश्वर बोरसे, महिला पोलिस निरीक्षक: मनिषा सरोदे, किरण शिरसाठ, पोलीस हवालदार सुकाम पवार, पोलीस अंमलदार समाधान पवार व गुन्हेशाखा युनिट क्रमांक २ कडील पोलीस हवालदार नंदकुमार नादुर्डीकर, प्रकाश महाजन, चंद्रकांत गवळी, मनोहर शिंदे, किरण आहेरराव, अतुल पाटील, महेश खांडबहाले, तेजस मते यांनी संयुक्तरित्या केली आहे.