नाशिक: अमेरिकन नागरिकांना गंडा घालणाऱ्या संशयितांना कोठडी

नाशिक (प्रतिनिधी): अमेरिकन नागरिकांना २ कोटींचा गंडा घालणाऱ्या सात संशयितांना मंगळवारपर्यंत (दि. १८) पोलिस कोठडी सुनावण्यात आली. संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. सायबर पोलिसांनी अश्विननगर येथील जानकी बंगल्यात छापा टाकत मुंबईतील सात संशयितांना अटक केली होती.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: भरधाव मोटारसायकलच्या धडकेत २४ वर्षीय युवतीचा मृत्यू

पथकाने संशयित प्रणय जैस्वाल, साहिल शेख, मुकेश पालांडे, आशिष ससाणे, चांद बर्नवाल, सादिक खान, समीक्षा सोनावले (रा. मुंबई) यांना पथकाने बंगल्यातील एका छुप्या खोलीत कॉल सेंटर चालविताना अटक केली. सायबर तज्ज्ञांकडून लॅपटॉप व संगणकाची तपासणी केली असता अमेरिकेतील १५० नागरिकांना संगणक, लॅपटॉपमध्ये व्हायरस आल्याचे सांगत बिघाड दूर करण्याकरिता गिफ्ट व्हाऊचरचा नंबर देत डॉलर घेत होते.

⚡ हे ही वाचा:  मोठी बातमी! आयटीआर फायलिंगला मुदतवाढ, करदात्यांना मोठा दिलासा

संशयित डॉलरचे भारतीय करन्सीमध्ये बदल करत फसवणूक करत होते. संशयितांनी २ लाख ४० हजार डॉलर भारतीय करन्सीनुसार २ कोटीपेक्षा अधिक रकमेचा गंडा घातल्याचे तपासात निष्पन्न झाले. या कॉल सेंटरचे मास्टर माइंड बिपीन साहू, रॉनी उर्फ शादाब फरार आहे. पथक त्यांच्या मागावर आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here