
नाशिक (प्रतिनिधी): मुख्य कार्यालयाच्या आदेशानुसार बदलीवर नियुक्ती करण्यात आलेले सुंदर लटपटे यांनी आज सोमवारी (१७ फेब्रुवारी) रोजी महावितरणच्या नाशिक परिमंडळाच्या मुख्य अभियंताची सूत्रे स्वीकारली.
यापूर्वी ते लातूर परिमंडळाच्या मुख्य अभियंता या पदावर कार्यरत होते. प्रभारी मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्याकडून मुख्य अभियंता पदाचा पदभार त्यांनी स्वीकारला. मूळचे परभणी जिल्यातील रहिवासी असलेले सुंदर लटपटे यांनी आपल्या प्रदीर्घ सेवेत विविध महत्वाच्या पदावर काम केले आहे. नाशिक परिमंडळातीलच कर्जत विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून विद्युत मंडळामध्ये आपल्या प्रथम सेवेची सुरुवात त्यांनी केलेली आहे.
त्यानंतर अतिरिक्त कार्यकारी अभियंतापदी शेवगाव उपविभाग, भांडूप परिमंडळ, कळवा विभाग व परभणी मंडळ येथे कार्यरत होते. तर कार्यकारी अभियंता म्हणून परभणी, उदगीर, लातूर परिमंडल, निलंगा तसेच अहिल्यानगर शहर विभाग येथे कार्य केलेले आहे. यानंतर अधिक्षक अभियंता म्हणून बीड, रास्तापेठ, मुख्य कार्यालय तसेच प्रशिक्षण व सुरक्षा केंद्र एकलहरे नाशिक येथे मुख्य महाव्यवस्थापक पदावर त्यांनी सेवा दिली आहे. आज सकाळी रुजू झाल्यानंतर प्रभारी मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंते, विविध विभाग प्रमुख, अधिकारी, विविध संघटना यांनी त्याचे स्वागत केले.
“नाशिक परिमंडळातील सर्व ग्राहकांना अखंडित व शाश्वत वीजपुरवठा देण्याबरोबरच महावितरणच्या विविध योजना व सेवा याचा गतीमानतेने लाभ देण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.”