नाशिक: हृदयद्रावक; फॉर्च्युनरच्या धडकेत ३८ वर्षीय शिक्षिकेचा मृत्यू…

नाशिक (प्रतिनिधी): ऊसाचा रस पिण्यासाठी सहकारी शिक्षकांसोबत रस्त्यावरील रसवंतीजवळ उभ्या असलेल्या शिक्षिकेस भरधाव फॉर्च्युनर कारने जोरदार धडक दिल्याने रविवारी (दि. १६) दुपारी दोनच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात ३८ वर्षीय शिक्षिका ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

‘हिट अँड रन;च्या या प्रकरणात कार चालकाला ताब्यात घेण्यात आले असून मुंबई नाका पोलिसांत फेटल अपघाताची नोंद करण्यात आली आहे. गायत्री संदीप ठाकूर (रा. अनुश्री अपार्टमेंट, इंदिरानगर, नाशिक) असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. तर अपघातात एक पुरुष आणि एक महिला जखमी झाल्याचे कळते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: नदीजोड प्रकल्पच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गायत्री या मनोहर गार्डन शेजारी असलेल्या एका रसवंतीच्या गाड्यावर सहकारी शिक्षकांसोबत उसाचा रस पिण्यासाठी थांबल्या होत्या. त्याच वेळी इंदिरानगर बोगद्याकडून सीटीसेंटर मॉलकडे जाणाऱ्या भरधाव वेगातील (एमएच १४ जेई ०९००)या फोर्च्युनर कारने फूड ऑन व्हिल रिक्षा, रसवंती आणि रस्त्यालगतच्या पादचाऱ्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत गायत्री या बाजूला फेकल्या गेल्या.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एम. जी. रोडला मोबाइल दुकानात अमली पदार्थ सेवन; एनडीपीएसखाली गुन्हा दाखल

त्यांना गंभीर दुखापत झाल्याने गायत्री ठाकूर आणि अन्य दोन जखमींना गोविंदनगर परिसरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी गायत्री यांना तपासून मृत घोषित केले.

या अपघाताला कारणीभूत ठरलेला चालक सौरभ भोपे यांस मुंबईनाका पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. इंदिरानगर बोगद्याजवळील वाहतूक कोंडीने सर्वच त्रस्त आहेत. त्यातच बोगदा ते सिटी सेंटरपर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा विविध दुकाने, हातगाड्या लागतात. त्यामुळे अतिक्रमण वाढले असून याच विळख्याने रस्ता काबीज केला जात आहे. येथील अतिक्रमण तत्काळ हटविणे गरजेचे असल्याचे मत वाहनधारकांनी आणि नागरिकांनी व्यक्त केले.
DEVELOPING NEWS… अधिक माहिती मिळताच बातमी इथेच अपडेट होईल.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790