
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एमडी ड्रग विक्री करणाऱ्या संशयिताला अटक केली आहे. शहरातील पखालरोड रॉयल कॉलनी येथे ही कारवाई करण्यात आली. अरबाज असलम कुरेशी (रा. द्वारकानगरी) असे या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून ९२ हजार रुपये किमतीची १८.५ ग्रॅम एमडी, रोकड तसेच मोबाइल असा एकूण १ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वरीष्ठ निरीक्षक सुशिला कोल्हे यांना माहिती मिळाली की, एक इसम एमडी ड्रग्ज विक्री करण्याकरीता पखाल रोडवर येत आहे. पथकाने सापळा रचला व त्याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीमध्ये प्लास्टिकच्या लहान पाकीटात एमडी आढळून आली. मुंबईनाका पोलिस ठाण्यात संशयिताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित एमडी कुठे विक्री करत होता. याचा शोध सुरू आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक: सुशिला कोल्हे, संतोष नरूटे, सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई, सहायक पोलीस उपनिरीक्षक: रंजन बेंडाळे, देवकिसन गायकर, मंगला जगताप, पोलीस हवालदार: बळवंत कोल्हे, भारत डंबाळे, पोलीस अंमलदार: अनिरूध्द येवले, अविनाश फुलपगारे, बाळासाहेब नांद्रे, गणेश वडजे, योगेश सानप, चंद्रकांत बागडे (सर्व नेमणूक: अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, नाशिक शहर) यांनी केली आहे.
![]()


