LPG

नाशिक: दुभाजकावर दुचाकी धडकून युवक ठार

नाशिक (प्रतिनिधी): भरधाव जाणाऱ्या दुचाकीने दुभाजकाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीचालक ठार झाला. संभाजीनगर रोडवर नांदूरनाका येथे हा अपघात घडला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. विशाल भीमराव जाधव (१८, रा. बजरंगवाडी, शनी चौक) असे या ठार झालेल्या तरुणाचे

🔎 हे वाचलं का?:  कुंभमेळा २०२७: नाशिक रिंगरोडच्या ३ हजार ९५४ कोटींच्या नागरी कामांना प्रशासकीय मान्यता

नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विशाल जाधव (१८) हा एमएच १५ जेझेड ८६२३ या क्रमांकाच्या दुचाकीने घराकडे जात असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुभाजकावर दुचाकी आदळली. यात त्याच्या डोक्यास गंभीर मार लागला. १०८ रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790