नाशिक (प्रतिनिधी): महावितरणच्या शहर विभाग १ अंतर्गत सर्व उपविभागीय कार्यालयांमध्ये वीज बिल दुरुस्ती, तक्रारी व समस्यांचे निवारण करण्याच्या दृष्टीने सोमवार (दि. ३) ते बुधवार (दि. ४) दरम्यान सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ग्राहकांकरिता महावितरणच्या सर्वच उपविभागीय कार्यालयांत शिबिरामार्फत समस्या समाजवून घेण्यात येणार आहे.
पंचवटी, सिडको, सातपूर आणि भद्रकाली व नाशिक शहरातील उपविभागीय कार्यालयांमध्ये ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेऊन त्याची सोडवणूक करण्यात येणार आहे. यामध्ये वीज बिल दुरुस्ती, वाढीव भार मंजुरी, नोंदणी, गो ग्रीन नोंदणी तसेच इतर सुविधांचा लाभ, माहिती ग्राहकांना देण्याकरिता हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ग्राहकांनी त्यांच्या तक्रारींसदर्भातील कागदपत्रे व वीज देयके सोबत आणावीत.
या तीनही दिवशी उपविभागीय कार्यालयांमध्ये उपअभियंता, अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रत्येक ग्राहकाच्या समस्या व तक्रारी ऐकून त्याचे निवारण करणार आहेत. यामध्ये भारनियमनाचा फटका तसेच जादा बिल येत असेल तर त्यासंदर्भातील तक्रारी ऐकून घेतल्या जाणार आहेत. विभाग एकमधील जास्तीत जास्त ग्राहकांनी या शिबिरात तक्रारींसह उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता चेतन वाडे यांनी केले आहे.