नाशिक (प्रतिनिधी): सिटी लिंकच्या वतीने संत निवृत्तिनाथ महाराज यात्रेनिमित्त त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी शनिवार (दि. २५) व रविवार (दि. २६) असे दोन दिवस एकूण ३१२ बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
शनिवारी (दि. २५) नियमित बसच्या तपोवन डेपो येथून १५ तर नाशिकरोड डेपोतून १३ अशा एकूण २८ बसेसद्वारे नियमित ९२ फेऱ्या करण्यात येतात. तपोवन डेपोतून जादा ६ तर नाशिकरोड डेपोतून जादा ४ अशा एकूण १० जादा बसेसद्वारे ४० जादा फेऱ्या करण्यात येतील. नियमित ९२ व जादा ४० अशा एकूण १३२ बसफेऱ्या करण्यात येणार आहे.
रविवारी (दि. २६) तपोवन डेपोतून नियमित १५ तर नाशिकरोड डेपोतून १३ अशा एकूण २८ बसेसच्या माध्यमातून नियमित ९२ फेऱ्या होतील. तपोवन डेपोतून जादा १२ तर नाशिकरोड डेपोतून १० अशा एकूण २२ जादा बसेसद्वरे ८८ जादा फेऱ्या होतील. एकूण नियमित ९२ व जादा ८८ अशा एकूण १८० बस फेऱ्या होतील.
![]()


