मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी जमा होणार ? जाणून घ्या सविस्तर…

मुंबई (प्रतिनिधी): मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना जानेवारी महिन्याचा हप्ता २६ जानेवारी पूर्वी दिला जाणार आहे. या योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता देण्यासाठी ३ हजार ६९० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: डुबेरे-सोनारी ते भगूर रस्त्यासह समृद्धी महामार्ग इंटरचेंजसाठी ३४३.९९ कोटींची प्रशासकीय मान्यता

या योजनेसाठी राज्याच्या तिजोरीत निधी नसल्याची ओरड विरोधकांकडून करण्यात येत आहे. मात्र त्यासाठी पुरेसा निधी शासनाकडे असून त्यातूनच लाभार्थ्यांना पैसे दिले जात असल्याचे महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

या योजनेसाठी जानेवारी महिन्यासाठी आवश्यक असलेल्या ३ हजार ६९० कोटी रुपयांच्या निधीला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली असून २६ जानेवारीपूर्वी हा निधी लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा केला जाईल, असे या विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यात शनिवारपासून पावसाचा ‘यलो अलर्ट’; घाटमाथ्यावर रविवारी ‘ऑरेंज अलर्ट’

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिना १ हजार ५०० रुपये दिले जातात. महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आला आहे. त्यानंतर जानेवारीचा हप्ता कधी मिळणार, याकडे महिलांचे लक्ष आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790