नाशिक (प्रतिनिधी): कंपनीमध्ये जॉब देण्याच्या बहाण्याने २३ लाखांत ऑनलाइन गंडा घालण्यात आला. अज्ञात भामट्यांविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी व साक्षीदार हे सुशिक्षित बेरोजगार असून कामाच्या शोधात होते. ही संधी साधून अनोळखी मोबाइल क्रमांकधारक इसमाने फिर्यादी व साक्षीदारांशी संपर्क साधला.
निरनिराळ्या मोबाइल क्रमांकांवरून संपर्क साधत करिअर बिल्डर्स एचआर एजन्सी व इनडीड डॉट कॉम या कंपनीतून बोलत असल्याचे भासविले. त्याचप्रमाणे टाटा मोटर्स व मलेशिया डेअरी इंडस्ट्रीज या कंपनीत बसाठी रजिस्ट्रेशन फी, एज्युकेशन व्हेरिफिकेशन, इंटरव्ह्यू प्रिपरेशन अशा विविध कारणांकरिता पैशांची मागणी केली. त्यासाठी भामट्यांनी वेगवेगळ्या लिंक पाठविल्या. विविध बँकांच्या खात्यांत एकूण २३ लाख ३८ हजार ४९७ रुपये भरण्यास भाग पाडले.
सायबर पोलिसात गुन्हा दाखल:
१० सप्टेंबर २०२३ ते २ जानेवारी २०२५ या कालावधीत इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम देऊनही जॉब मिळत नसल्याने हतबल झालेल्या फिर्यादी व साक्षीदाराने मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र संपर्क होऊ शकला नाही. मोबाइल बंदच लागत होता. त्यामुळे फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी सायबर पोलिस ठाणे गाठले. याबाबत पुढील तपास पोलिस निरीक्षक शेख करीत आहेत.
![]()


