नाशिक (प्रतिनिधी): मखमलाबाद परिसरातील शांतीनगर येथे एका महिलेवर नाशिक रोड जेलरोड येथे राहणाऱ्या सराईत गुन्हेगाराने धारदार हत्याराने पाठीवर दोन वेळा वार करून जखमी केल्याची घटना काल शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमाराला घडली आहे.
याबाबत शांतीनगर येथे राहणाऱ्या योगीता साळवे यांनी म्हसरूळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यावरून नाशिकरोड जेलरोड येथे राहणाऱ्या संशयित दीपक कुमावत याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शांतीनगर येथे राहणाऱ्या साळवे ह्या शनिवारी सकाळी भाबड प्लाझा मखमलाबाद शिवार शांतीनगर येथे बोलत असताना संशयित आरोपी कुमावत त्या ठिकाणी आला व त्याने हातातील हत्याराने पाठीवर दोन वेळा वार करून पलायन केले. संशयित आरोपी कुमावत याच्यावर यापूर्वी नाशिकरोड पोलिस ठाण्यात तीन ते चार गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. (म्हसरूळ पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३०५/२०२४)
![]()


