मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात येणारी बारावीची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५, तर दहावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ या कालावधीत होणार आहे.
दहावी व बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले. त्यानुसार बारावीची प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन, तोंडी परीक्षा ते १० फेब्रुवारी दहावीची प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन, तोंडी परीक्षा ३ ते २० फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.
यावेळी राज्य मंडळाच्या परीक्षा आठ ते दहा दिवस लवकर होत आहेत. दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये परीक्षा होतात. निकाल मे-जूनमध्ये लागतो. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठीची पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये होते.
यात जाणारा वेळ, अभ्यासासाठी वेळ मिळणे, प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्याच्या दृष्टीने मंडळाने यंदा परीक्षा आठ ते दहा दिवस लवकर घेण्याचा निर्णय घेतला होता. परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.