नाशिक: ‘वोटोथॉन’; मतदार जनजागृतीसाठी धावले नाशिककर !

नाशिक (प्रतिनिधी): ‘मतदार लोकशाहीचा खरा आधार’, ‘व्होटकर नाशिककर’, ‘सुजाण आणि जागरूक मतदार व्हा’, ‘मी मतदान केले आहे, तुम्हीही मतदान करा’, ‘चला आपण लोकशाही रुजवू या’, असा संदेश देत आज सकाळी नाशिककर मतदार जनजागृतीसाठी धावले. निमित्त होते महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे !

महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १५ मतदारसंघात २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या कालावधीत मतदान होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा, ‘स्वीप’च्या मुख्य समन्वयक तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आज भारतीय सेनेच्या आधुनिक शस्त्रसामग्रीसह आपत्ती प्रतिसाद दल उपकरणांचे प्रदर्शन

या उपक्रमांचा एक भाग म्हणून आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने वोटोथॉनचे आयोजन करण्यात आले होते. महात्मानगर येथील मैदानापासून या वोटोथॉनला सुरुवात झाली. तीन आणि पाच किलोमीटर अशा दोन गटात ही वोटोथॉन झाली. प्रारंभी इस्पॅलिअर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्केटिंग करीत मतदानाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती केली. तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या बॅण्ड पथकाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.

यावेळी विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हाधिकारी श्री. शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मित्तल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, अभिनेते किरण भालेराव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या वोटोथॉनसाठी विविध सामाजिक, स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य लाभले. यावेळी महानगरपालिकेचे उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, डॉ. प्रदीप चौधरी, तहसीलदार अमोल निकम, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी रवींद्र परदेशी, वर्षा फडोळ, गटशिक्षणाधिकारी डॉ. निमा चौधरी यांच्यासह वोटोथॉनसाठी सहकार्य करणाऱ्या संस्थांचे पदाधिकारी, डॉ. सचिन जोशी, संदीप सोनार, अनिरुद्ध अथनी, पूनम आचार्य, भूषण पटकरी आदी उपस्थित होते. डॉ. गेडाम, श्रीमती मित्तल यांनी मार्गदर्शन करीत नागरिकांना मतदानाचे आवाहन केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्या (दि. २६) विविध कार्यक्रमांचे आयोजन

विद्यार्थ्यांचा विशेष सहभाग:
नाशिक स्कूल असोसिएशनच्या माध्यमातून 15 पेक्षा अधिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सर्व सहभागींना प्रोत्साहित केले. त्यामध्ये स्केटिंग, बॅण्ड, प्लास्टिक बॅण्‍ड, ढोल पथक, लेझीम पथकांचा विशेष सहभाग होता. या मध्ये इस्पॅलिअर स्कूल, जेम्स स्कूल, डीपीएस स्कूल, माऊंट लेरिया स्कूल, आयुष स्कूल, ग्लोबल व्हिजन स्कूल, एमएटी मीना भुजबळ स्कूलमधील विद्यार्थ्यांचा या पथकात समावेश होता.

🔎 हे वाचलं का?:  राष्ट्रीय मतदार दिवस: राज्यस्तरीय कार्यक्रमानिमित्त नाशिकला आज (दि. २५) विविध कार्यक्रम

वेशभूषेबद्दल गौरव:
वोटोथॉनमध्ये मतदार जनजागृतीसाठी उत्कृष्ट वेशभूषा केल्याबद्दल कुंदा बच्छाव, तुषार पगार, प्रवीण खोडे, राहुल शिंपी, मनोहर जगताप, प्रतीक्षा वानखेडे यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

वोटोबा करतोय जनजागृती:
‘माझे मत माझा अधिकार’, असे सांगत जनजागृती करणारा ‘वोटोबा’ यावेळी उपस्थित होता. त्यानेही जनजागृती केली. यावेळी उपस्थित नागरिकांनी त्याच्याबरोबर मोबाईलवर सेल्फी घेतले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790