नाशिक: अवैध सावकार वैभव देवरेच्या पत्नीचा जामीन अर्ज फेटाळला

नाशिक (प्रतिनिधी): अवैध सावकार वैभव देवरे याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाच्या कुटुंबियांच्या तक्रारीनुसार दाखल केलेल्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या सोनल देवरेने जामिनासाठी केलेला अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला.

दरम्यान, वैभव देवरे याच्या प्रत्येक कृत्यात पत्नी सहभागी असल्याचे पुरावे पोलिस तपासत पुढे आले असून जामीन मिळाल्यास ती फरार होऊ शकते, त्यामुळ तिला जामीन देऊ नये, असा युक्तिवाद सरकार पक्षाच्या वतीने करण्यात आल्याने न्यायालयाने तो ग्राह्य धरला. गंगापूररोडवरील रहिवासी व्यावसायिक धीरज पवार यांनी संशयित वैभव देवरेकडून ७ लाखांचे कर्ज घेतले होते. त्या बदल्यात १२ लाख देऊनही देवरेने सक्तीने वसुली सुरूच ठेवली होती.

🔎 हे वाचलं का?:  राज्यात दोन दिवस ढगाळ वातावरण; काही भागांत हलक्या पावसाची शक्यता

त्याच्या जाचाला कंटाळूनच पवार यानी आत्महत्या केली. याच प्रकरणात प्राणघातक हल्ला करून त्याचबरोबर पोलिसात दाखल तक्रारीनुसार देवरे याच्यासह त्याची पत्नी सोनाली देवरे व शालक निखिल पवार वारंवार पवार यांच्या घरी जात धमकावत होते. सद्यस्थितीत वैभव देवरेसह तिघेही मध्यवर्ती कारागृहात आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चोरीच्या पाच मोटारसायकलींसह आरोपी अटकेत; पाच गुन्हे उघडकीस

अवैध सावकार पती-पत्नीविरोधात युक्तिवाद ग्राह्य:
सदर गुन्ह्यात देवरे पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल होताच वैभव देवरे फरार झाला होता. त्यामुळे त्याची पत्नी सोनल जामीन मिळाल्यास ती फरार होऊ शकते. संशयिताविरोधात गंभीर स्वरूपाचा आरोप असून त्यात एकाने जीव गमावला आहे. पोलिस तपासात व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे देवरेकडून होणारा छळ, धमकावणे, मारहाण, शिवीगाळ ही दिसून आली आहे. पोलिसांनी घेतलेल्या साक्षीदाराच्या जबाबात सोनल देवरे ही सुद्धा वारंवार फोनद्वारे धमकावत व शिवीगाळ करीत असल्याने तिला जामीन देऊ नये, असा युक्तिवाद फिर्यादीच्या वकील ऐश्वर्या हिरे-खैरनार यांनी केला. तपासी अधिकारी निरीक्षक अंचल मुदगल यांनी बाजू मांडली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790