नाशिक: युवतीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्याला दहा वर्षांची शिक्षा

नाशिक (प्रतिनिधी): चार वर्षांपूर्वी पीडित फिर्यादी महिलेच्या मैत्रिणीवर आरोपी हेमंत बाबूराव गांगुर्डे (२६, रा. फुलेनगर) याने कोयत्याने वार करून गंभीररीत्या जखमी केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात गुरुवारी (दि.१४) अंतिम सुनावणी होऊन जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. राठी यांनी गांगुर्डे यास दोषी धरले. त्यास दहा वर्षांची सक्तमजुरी व २० हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आज भारतीय सेनेच्या आधुनिक शस्त्रसामग्रीसह आपत्ती प्रतिसाद दल उपकरणांचे प्रदर्शन

कमरेला पाठीमागे लपवून ठेवलेला कोयता काढून सपासप वार केले होते. ११ मे २०२१ रोजी गांगुर्डे याने देवळाली गाव येथील रहिवासी असलेल्या २२ वर्षीय तरुणीसह पंचवटीतील अश्वमेधनगरमधील तिच्या मैत्रिणीवर हल्ला केला होता. या हल्ल्यात अश्वमेधनगरातील रहिवासी युवती गंभीररीत्या जखमी झाली होती. या दोघी मैत्रिणी गांगुर्डेला मागील भांडणाचा जाब विचारण्यासाठी फुलेनगर येथे गेल्या होत्या.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ.गेडाम यांच्या हस्ते ध्वजारोहण

यावेळी त्याने ‘तुमची कटकटच मिटवतो…’ असे म्हणून त्याच्या कमरेला पाठीमागे लावलेला कोयता काढून हल्ला चढविला होता. फिर्यादी महिलेने यावेळी पळ काढला. मात्र, तिची मैत्रीण या हल्ल्यात सापडली होती. यावेळी फिर्यादीने तिला त्याच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला असता तिच्याही हातांवर वार करून जखमी करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले होते.

याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी जीवेठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करत गांगुर्डे यास अटक केली होती. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक एस. जी. डंबाळे यांनी तपास करून आरोपीविरुद्ध सबळ पुराव्यांसह दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. एस. एल. सोनवणे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने गांगुर्डे यास दोषी धरले. दंडाची न भरल्यास आरोपी गांगुर्डे यास सहा महिन्यांचा अतिरिक्त साधा कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790