नाशिक: समाजातील सर्व घटकांसाठी काम केलेल्या मध्य नाशिक विधानसभेतील आमदार प्रा. देवयानी फरांदे यांचा विजय निश्चित होणार, अशी ग्वाही सकाळ-सायंकाळच्या सत्रात भाजप नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी दिली. त्यांच्या प्रचारासाठी शहरातील प्रतिष्ठित नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत.
भाजप नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांच्या परिस्थितीत प्रभाग क्र. १२ मधील गायकवाडनगर, प्रथमेशनगर, मातोश्रीनगर व गणेश कॉलनी या परिसरात घरोघरी प्रचार संपर्क साधला. मध्य नाशिक विधानसभेतील महायुतीच्या उमेदवार प्रा. सौ. देवयानी फरांदे यांना आपले बहुमूल्य मत देऊन विजयी करावे, असे आवाहन करण्यात आले.
परिसरातील रहिवासी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला व आपले अमूल्य मत विकासपर्वाला असेल असे निक्षुन सांगितले.
घरोघरी काढण्यात आलेल्या प्रचार फेरीत भाजप ज्येष्ठ कार्यकर्ते अभय छल्लाणी, नंदकुमार देसाई, नरेंद्र सोनवणे, प्रदीप पाटील, कैलास चौधरी, अविनाश जासुंदे, शिरीष भुमकर, भाजप ज्येष्ठ कार्यकर्त्या भारती मोरे, श्रीमती नानीवडेकर, मीनाक्षी वैद्य, श्रीमती भुमकर इत्यादी कार्यकर्ते व रहिवासी नागरिक यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. परिसरातील समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, डॉक्टर्स, वकील, उद्योजक, प्राचार्य व शिक्षकवर्ग, निवृत्त सरकारी अधिकारी, कर्मचारी छोटे- मोठे व्यावसायिक यांच्या भेटीगाठी भाजप नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यासह विविध कार्यकर्ते यांनी घेतल्या व सर्वांनी प्रा. फरांदे यांच्या आतापर्यंतच्या कार्याची प्रशंसाच केली.
![]()


