नाशिक: शेअर्समध्ये गुंतवणुकीचे आमिष; वृद्धाची ७४ लाखांची फसवणूक

नाशिक (प्रतिनिधी): शेअर मार्केटमध्ये आर्थिक गुंतवणूक केल्यानंतर जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून वृद्धाची ७४ लाख रुपयांची फसवणूक भामट्याने केली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात सुनील सिंघानिया या संशयिताविरोधात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर अपघात, पिता-पुत्रासह तिघे ठार

पोलिसांनी दिलेली माहिती आणि गुप्ता (वय: ७२, रा. गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, संशयिताने वृद्धाची ११ सप्टेंबर ते ३० ऑक्टोबर गुप्ता यांच्यासोबत मोबाइलवरून संपर्क साधला. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास कमी कालावधीत जास्त परतावा मिळवून देतो असे आमिष दाखवले.

हे ही वाचा:  नाशिक: बेदम मारहाणीत युवकाचा मृत्यू; पित्यासह भाच्याला अटक !

तसेच गुप्ता यांना व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करून त्यांना शेअर मार्केटमधून परतावा मिळत असल्याची खोटी माहिती दिली. गुप्ता यांनी भामट्यास वेळोवेळी ७४ लाख रुपये दिले. गुप्ता यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पैसे मिळाले नाहीत. (गंगापूर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: २७८/२०२४)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790