नाशिक: उसने पैसे न देता दाजीची दमदाटी, एकाची आत्महत्या; दोघांवर गुन्हा दाखल

नाशिक (प्रतिनिधी): दाजीला दिलेले पैसे परत न देता भांडण करत मानसिक छळ झाल्याच्या कारणातून पतीने आत्महत्या केल्याच्या तक्रारीनुसार पतीच्या दाजीसह मित्राच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  राष्ट्रीय मतदार दिवस: राज्यस्तरीय कार्यक्रमानिमित्त नाशिकला आज (दि. २५) विविध कार्यक्रम

पोलिसांनी दिलेली माहिती आणि कोमल भरत गांगुर्डे (रा. चुंचाळे, अंबड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पतीचे दाजी संशयित कृष्णा शिंदे यांना पतीने तीन लाख ५० हजार रुपये उसने दिले होते. तसेच संशयित राजेंद्र पवार यांनाही पाच लाख रुपये उसने दिले होते. उसने पैसे पती भरत गांगुर्डे यांनी परत मागितले असता दाजी शिंदे यांनी पैसे परत दिले नाही.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चोरीच्या पाच मोटारसायकलींसह आरोपी अटकेत; पाच गुन्हे उघडकीस

उलट भांडण करत पतीला मानसिक त्रास दिला. या त्रासातून पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची तक्रार दिली. याप्रकरणी संशयित कृष्णा शिंदे आणि राजेंद्र प्रवर यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (अंबड पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ७६२/२०२४)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790