नाशिक: दिवाळीनिमित्त एसटीच्या अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन

नाशिक (प्रतिनिधी): दिवाळीनिमित्त एसटीच्या फेऱ्या वाढणार आहेत. दिवाळीत प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेत राज्य परिवहन विभागाने पुणे, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, बोरिवली, कसारा मार्गावर अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन केले आहे.

पुण्यासाठी ३० हून अधिक, छत्रपती संभाजीनगरसाठी १० आणि धुळ्यासाठी २० हून अधिक फेऱ्या होणार आहेत. विभागातंर्गत असलेल्या मालेगाव, सटाणा, मनमाड, नांदगाव, इगतपुरी, लासलगांव, कळवण, पेठ, पिंपळगाव या आगारांमार्फतही विविध मार्गावर अतिरिक्त फेऱ्या होणार आहेत.

👉 हे ही वाचा:  नाशिक: सोमवारी (दि. १४) विभागीय लोकशाही व महिला लोकशाही दिनाचे आयोजन

मालेगाव, सटाणा, येवलासाठी जादा बससेवेचे नियोजन आहे. महिला सन्मान योजनेतंर्गत महिलांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने सवलत दिली जात आहे. तसेच नाशिक-पुणे मार्गावर शिवशाही सेवा प्रकारातील अतिरिक्त फेऱ्या आरक्षणासाठी उपलब्ध केलेल्या आहेत.

👉 हे ही वाचा:  नाशिकला पावसाची थोडी उसंत; घाटमाथ्यावर रविवारी आणि सोमवारी 'यलो अलर्ट' जारी

प्रवाशांनी या अतिरिक्त फेऱ्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. महामंडळाच्या वतीने साधी बस तसेच वातानुकूलित बससेवेत कुठल्याही प्रकारची भाडेवाढ करण्यात आलेली नाही.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790