नाशिक शहरातील संशयिताच्या खात्यात ५ लाख जमा
नाशिक (प्रतिनिधी): शहरातील मेटल व्यावसायिकास आयआयएफएलएस सिक्युरिटीज नावाने फायनान्शियल कंपनीच्या नामसाधम्र्याने नामांकित कंपनीच्या नावे गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून बनावट लिंक व अॅपद्वारे सुमारे एक कोटी ३६ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणात व्यावसायिकाची ज्या व्हॉट्सअॅप क्रमांकावरून बँक खाते देण्यात आले, त्यातील एक बँक खातेदार हा नाशकातीलच असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्या खात्यावर पाच लाख जमा होताच नाशिकमधीलच एका संशयिताच्या बँक खात्यात जमा झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी संशयितास अटक केली आहे.
मेटल व्यावसायिकाचा मोठा उद्योग नसून त्यांनी त्याचा व्यवसाय मुलांच्या हाती सोपवला आहे. दरम्यान, व्यावसायिकाने त्याच्या बँक खात्यांची माहिती व बँक खाती चालविण्यास दुसऱ्या व्यक्तीस अधिकार दिले होते. ३ ऑगस्ट ते १७ ऑक्टोबर या कालावधीत व्यावसायिक घरी असताना, त्याला संशयित श्रमिकदास शर्मा, मंजू पचिसीया व प्रणय अशा नावांच्या भामट्यांनी संपर्क साधला. पैसे गुंतवल्यास कमी कालावधीत दामदुप्पट परतावा मिळेल असे भामट्यांनी व्यावसायिकास आमिष दिले.
त्यानंतर व्यावसायिकास बनावट लिंक पाठवून नामांकित फायनान्सचे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. व्यावसायिकास दामदुप्पट परताव्याच्या योजना सांगण्यात आल्या. व्यावसायिकाचा विश्वास संपादन करुन एक व्हॉटसअॅप ग्रुप तयार करुन त्यास ग्रुपमध्ये समाविष्ट केले. त्यातून आर्थिक गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. या आमिषाला बळी पडून व्यावसायिकाने संशयितांनी सुचविलेल्या विविध बँक खात्यात टप्याटप्याने एक कोटी ३६ लाख रुपयांची गुंतवणूक केली.
नाशिक शहरातील एकाच्या खात्यात पैसे वर्ग:
या फसवणुकीत पैसे वर्ग झालेल्या बहुतांश बँक खात्यांपैकी एकाची ओळख पटली आहे. सिडको परिसरातील तनय संदेश दत्त (रा. लक्ष्मीनगर, महाराणा प्रताप चौक, सिडको) याचे असल्याचे निष्पन्न झाले. व्यावसायिकाच्या वर्ग झालेल्या रकमेपैकी ५ लाखांची रक्कम दत्तच्या बँक खात्यात वर्गझाल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी त्यास अटक केली. व्यावसायिकासोबत संपर्क साधणाऱ्यांच्या खातेधारकांविरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
![]()


