नाशिक: मतदानाच्या दोन दिवस आधीपासून मद्य विक्री बंद राहणार

नाशिक (प्रतिनिधी): भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार असून मतमोजणी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे. विधानसभा निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक असलेल्या मतदारसंघाच्या हद्दीतील सर्व अबकारी अनुज्ञप्त्या १८ ते २० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत आणि २३ नोव्हेंबर २०२४ रोजी बंद ठेवण्यात येणार आहेत. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चोरीच्या पाच मोटारसायकलींसह आरोपी अटकेत; पाच गुन्हे उघडकीस

महाराष्ट्र देशी दारू नियम, महाराष्ट्र विदेशी मद्य नियम (रोखीने विक्री, विक्री रजिस्टर इ.), महाराष्ट्र ताडी दुकाने (अनुज्ञप्ती) आणि ताडीची झाडे नियम, विशेष परवाने आणि अनुज्ञप्ती नियम, महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार नाशिक जिल्ह्यातील सर्व ठोक व किरकोळ देशी/विदेशी मद्य विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश देत आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकच्या सायकलपटूंनी रॅलीतून दिला 'माझा भारत - माझं मत'चा संदेश
🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आज भारतीय सेनेच्या आधुनिक शस्त्रसामग्रीसह आपत्ती प्रतिसाद दल उपकरणांचे प्रदर्शन

जे अनुज्ञप्तीधारक या आदेशाची अंमलबजावाणी करण्यास कुचराई करतील त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ५४ व ५६ नुसार कडक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही जिल्हाधिकारी शर्मा यांनी नमूद केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790