जिल्ह्यात आजपर्यंत २९ हजार ४२१ रुग्ण कोरोनामुक्त; ७ हजार ०९३ रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २९ हजार ४२१ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ७ हजार ०९३ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ८७२  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये  नाशिक ३८४, चांदवड ५५, सिन्नर ३७०, दिंडोरी ५३, निफाड ३७३, देवळा ६९,  नांदगांव २४८, येवला ७७, त्र्यंबकेश्वर १८, सुरगाणा ०६, पेठ ०६, कळवण १३,  बागलाण २१२, इगतपुरी ६६, मालेगांव ग्रामीण ३०६ असे एकूण २ हजार २५६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ४ हजार १८७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ६४०  तर जिल्ह्याबाहेरील १० असे एकूण ७ हजार ९३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  ३७  हजार ३८६  रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ७२.६७,  टक्के, नाशिक शहरात ८१.६२ टक्के, मालेगाव मध्ये ७०.६४  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८४.९३ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७८.७० इतके आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण २४६, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  ४९१, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ११२ व जिल्हा बाहेरील २३ अशा एकूण ८७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

(वरील आकडेवारी आज दि. १ सप्टेंबर २०२०) सकाळी ११.०० वाजता  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790