नाशिक: आदर्श आचार संहिता कालावधीत ‘हे’ निर्बंध राहतील लागू !

नाशिक (जिल्हा माहिती कार्यालय): भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम 15 ऑक्टोबर 2024 रोजी घोषित केला आहे. या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आली आहे.

जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून निवडणुकीच्या प्रचारासाठी कोणत्याही व्यक्तिगत जागा, इमारत, आवार, भिंत इत्यादी संबंधित जागा मालकांच्या पूर्व परवानगी शिवाय व संबंधित परवाना देणाऱ्या प्राधिकरणाच्या परवानगी शिवाय वापर करण्यास निवडणूक प्रक्रिया 25 नोव्हेंबर 2024 पूर्ण होईपर्यंत जिल्हादंडाधिकारी जलज शर्मा यांनी निर्बध घालण्याचे आदेश दिले आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: भरधाव दुचाकीच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

या आदेशान्वये राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी व हितचिंतकांनी निवडणूक प्रचारासाठी झेंड्याच्या काठ्या उभारणे, कापडी फलक लावणे, भित्तीपत्रके लावणे, घोषणा लिहण्यासाठी कोणत्याही व्यक्तीची जागा, इमारत, आवार भिंती इत्यादीवर मालकाच्या परवानगी शिवाय व संबंधीत परवाना प्राधिकरणाच्या परवानगी शिवाय वापर करण्यास मनाई आहे.

हे ही वाचा:  नाशिक: बेकायदा गॅस भरणाऱ्या अड्ड्यावर छापा; तब्बल १८० सिलिंडर जप्त, दोघे ताब्यात !

हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहतील. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 223 अन्वये कारवाई केली जाईल, असेही जिल्हादंडाधिकारी शर्मा यांनी आदेशित केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790