नाशिक: भरधाव दुचाकीच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): रस्ता ओलांडणाऱ्या ८२ वर्षीय वृद्धाला भरधाव दुचाकीस्वाराने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात वृद्धाचा मृत्यू झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत किरण काशीनाथ रावबच्चे (रा. शिवशक्तीनगर, जेलरोड, नाशिकरोड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले, की त्यांचे वडील काशीनाथ नरसिंगराव रावबच्चे हे मॉडेल कॉलनी येथे देशमुख भवनासमोर पायी रस्ता ओलांडत होते. त्यावेळी जेलरोड पाण्याच्या टाकीकडून भरधाव आलेल्या अज्ञात दुचाकीस्वाराने रावबच्चे यांना जोराची धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी होऊन ते ठार झाले. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दुचाकीस्वाराच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अहिरे करीत आहेत.

Loading

हे ही वाचा:  नाशिक: स्टॉक ट्रेडिंगच्या बहाण्याने दाम्पत्याने केली दोन लाखांची फसवणूक

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790