नाशिक: बुटात चावी ठेवणे पडले महाग! लॅपटॉप गेला चोरीला…

नाशिक (प्रतिनिधी): शिक्षणानिमित्ताने आलेल्या युवकाला बाहेर जाताना फ्लॅटची चावी बुटात ठेवून जाणे चांगलेच महागात पडले असून, त्याचा ७० हजारांचा लॅपटॉप अज्ञात चोरट्याने चोरून नेला.

बुटामध्ये ठेवलेल्या बंद फ्लॅटच्या चावीने फ्लॅट उघडून ७० हजारांचा लॅपटॉप अज्ञात चोरट्याने चोरून नेला. यश पांडुरंग झगरे (२०, राहणार: माळशेंब, ता. चिखली, जिल्हा: बुलढाणा; सध्या राहणार: पुष्पक अपार्टमेंट, स्नेहनगर, म्हसरुळ) याच्या फिर्यादीनुसार, रविवारी (ता. १३) दुपारी सदरचा प्रकार घडला. याप्रकरणी म्हसरुळ पोलीसात गुन्हा दाखल आहे. (म्हसरूळ पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: २५०/२०२४)

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गुन्हे शाखेची कारवाई : फरार सराईत आरोपी मुंबईतून अटकेत
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790