नाशिक (प्रतिनिधी): इंदिरानगर बोगदा ते मुंबईनाक्यादरम्यान रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यात आल्याने या मार्गांवरील बसच्या फेऱ्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
त्यानुसार आता महामार्ग, छान हॉटेल, कमोदनगरमार्गे जाऊन पुढे लेखानगर येथून हायवे क्रॉस करून पुढे मार्गस्थ होतील. निमाणी ते अंबड गाव, निमाणी ते सिम्बायोसिस कॉलेज, निमाणी ते जातेगाव, निमाणी ते घरकुल, नाशिकरोड डेपो ते अंबड गाव या मार्गावर १५ ऑक्टोबर २०२४ पासून बदल होणार आहे. निमाणीच्या दिशेने येणाऱ्या बसेसच्या मार्गात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790