नाशिक: बसचालकाला मारहाण करणाऱ्या आरोपीला कारावास !

नाशिक (प्रतिनिधी): बसचालकाच्या कॅबिनमध्ये बसलेल्या आरोपीला पाठीमागे सांगण्यास सांगितले असता, त्याने बसचालकाला मारहाण केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने एका वर्षाचा कारावासाची शिक्षा व ५ हजारांच्या दंड ठोठावला आहे.

अरबाज आयुब शेख (२०, रा रेणुकानगर, वडाळानाका. सध्या रा. अकोले रोड, संगमनेर, जि. अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे. रामराव साहेबराव चव्हाण (राजगुरू बस आगार, पुणे) यांच्या फिर्यादीनुसार, २ ऑगस्ट २०१९ रोजी सायंकाळी ते नाशिकहून पुण्याला प्रवासी घेऊन निघाले.

हे ही वाचा:  नाशिक: 'सावाना'तर्फे आज 'स्वर सावाना'त संवादिनी, मोहनवीणा, तबला वादन

त्यावेळी आरोपी बसचालकाच्या कॅबिनमध्ये बसला असता, त्यास त्यांनी पाठीमागे जाण्यास सांगितले. त्या रागातून आरोपीने बसचालक चव्हाण यांना मारहाण केली होती. या प्रकरणी भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल होता. तत्कालीन सहायक निरीक्षक एस.एस. वऱ्हाडे यांनी गुन्ह्याचा तपास करीत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सदरील खटला जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी.एम. बदर यांच्यासमोर चालला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790