
नाशिक (प्रतिनिधी): थायलंड येथुन बेकायशिर रित्या आयात केलेला गांजा विक्री करणाऱ्या नाशिकच्या दोन युवकांना जेरबंद करण्यात नाशिक शहर पोलिसांना यश आलं आहे.
दि. ७ ऑक्टोबर रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना गोपनीय माहिती मिळाली कि, संशयित विशाल वसंत बावा/गोसावी (वय २५ वर्षे, रा.नवजीवन शाळेसमोर, सप्तश्रृंगी माता मंदिराजवळ, शिवशक्ती चौक, नाशिक) तसेच संशयित लविन महेश चावला (वय-२६ वर्षे, इंदिरानगर, नाशिक) यांनी भारताबाहेरील देशातुन अंदाजे २ लाख २४ हजार रुपये किंमतीचा ६८६ ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ स्वतःच्या फायदयासाठी बेकायदेशिररित्या कब्जात बाळगुन विक्री करत आहेत.
सदर आरोपी यांना पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी स्वतःचे कौशल्य वापरून शिताफीने पकडुन जप्त करून, नमुद आरोपीविरूध्द अंबड पोलीस ठाणे येथे ६६२/२०२४ एन.डी.पी.एस. १९८५ चे कलम ८ (क), २०(अ), २९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी पथकाकडील पोलीस करीत आहेत.
संशयित आरोपी विशाल वसंत बावा / गोसावी हा रेकॉर्डवरील आरोपी असुन त्याचेविरूध्द अंबड व सातपूर पोलीस स्टेशनला गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव तसेच सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, विशाल पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, देवकिसन गायकर, संजय ताजणे, पोलीस हवालदार भारत डंबाळे, बळवंत कोल्हे, पोलीस अंमलदार बाळासाहेब नांद्रे, योगेश सानप, चंद्रकांत बागडे, अविनाश फुलपगारे, महिला पोलीस अंमलदार अर्चना भड सर्व अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, नाशिक शहर यांनी बजावली आहे.
![]()


