नाशिक: पोलिसांनी रचला सापळा, २७ लाखांचा गुटखा जप्त

नाशिक (प्रतिनिधी): मालवाहू ट्रकमधून अवैध गुटखा वाहतूक करणारा ट्रक पाठलाग करत घोटी टोल नाका येथे पकडण्यात आला. त्यातून २७ लाख ५० हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला.

अली हसन गुलाम हुसेन (रा. ठाणे), मेहताब इबरार अली (रा. उत्तर प्रदेश) या दोघांना अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे राजू सुर्वे यांना ही माहिती मिळाली. त्यानुसार महामार्गावर सापळा रचण्यात आला. पिंपळगाव बसवंत ते घोटी टोल नाका महामार्गावर संदेश पवार, प्रकाश कासार, विनोद टिळे, हेमंत गिलबिले यांच्या पथकाने संशयित ट्रकचा पाठलाग केला. दुसऱ्या पथकाने टोल नाक्यावर तो थांबवला.

Join Us On:

तपासणी केली असता ट्रान्सपोर्टच्या साहित्याच्या मागे गोण्यांमध्ये गुटखा सापडला. संशयितांच्या विरोधात घोटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790