NC

नाशिक: ५ अल्पवयीन मुलांनी मैत्रिणींसोबत फिरण्यासाठी चोरल्या ११ दुचाकी

नाशिक (प्रतिनिधी): सोशल मीडियावर वाहनासंबंधीचे विविध रिल्स बघून मुलींसोबत रायडिंग करण्यासाठी ५ अल्पवयीन मुलांनी ११ दुचाकींची चोरी केली. या दुचाकींची आपसात अदलाबदल करत मौजमजा करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

चौकशीत त्यांनी शहराच्या विविध भागांतून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. मुलांच्या पालकांना पोलिस ठाण्यात बोलावून मुलांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. म्हसरुळ पोलिस ठाण्याच्या गस्त पथकाने विनानंबर दुचाकी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र ती न थांबल्याने पथकाने त्यांचा पाठलाग करून एस.टी. वर्कशॉप येथे त्यांना पकडले.

🔎 हे वाचलं का?:  चौथे विश्व मराठी संमेलन: संमेलनातील स्टाॅलवरील चरित्रग्रंथ आणि कथांना वाचकांची विशेष पसंती

कागदपत्रांची चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने पथकाने कसून चौकशी केली असता मौजमजेसाठी ५ मित्रांनी ११ दुचाकी चोरी केल्याची माहिती मिळाली. नंबरप्लेट काढून टाकत दिवसा मुलींना सोबत फिरवत मौजमजा केल्यानंतर रात्री दुचाकी आडबाजूला लपवून ठेवत असल्याचीही त्यांनी कबुली दिली. गेल्या ६ महिन्यांपासून त्यांची ही मौजमजा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. संशयितांनी म्हसरुळ ४, पंचवटी २, उपनगर २, भद्रकाली १ आणि ग्रामीणमधून २ अशा ११ दुचाकी चोरल्या आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790