नाशिक (प्रतिनिधी): शेअर्स मार्केटमध्ये ट्रेडिंग केल्यास जादा नफा मिळवून देण्याचे आमिष देत महिला ब्रोकरने गुंतवणूकदाराला १७ लाख ५० हजारांना गंडा घातला. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
निकम (रा. आडगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ऑगस्टमध्ये मोबाइलवर एका शेअर्स – कंपनीच्या नावाने लिंक आली. – ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. – ग्रुपमधील जोशी नामक – महिलेने शेअर्स मार्केटमध्ये ट्रेडिंग केल्यास जादा नफा मिळेल, असे आमिष देत निकम यांना विविध कंपन्यांच्या शेअर्सचे पोर्टफोलिओ पाठवले.
शेअर्स खरेदी केल्यानंतर किती दिवसांत किमती वाढल्या याची माहिती दिली. निकम यांनी ट्रेडिंगची तयारी दर्शवली. महिलेने विविध कंपन्यांच्या नावाने शेअर्स खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या बँक खात्याचे नंबर देत त्यात रक्कम भरण्यास सांगितले. शेअर्सच्या किंमती वाढल्याचे सांगत किती नफा झाला याची माहिती दिली.
नफ्याची रक्कम काढण्याकरिता निकम यांनी सांगीतले असता महिलेने आणखी रक्कम गुंतवणूक केल्यास जादा नफा होईल असे सांगीतले. संशय आल्याने त्यांनी नातेवाइकांना विचारले असता ही फसवणूक असल्याचे समजले.
![]()


