LPG

नाशिक शहरात मोर्चे, आंदोलनांना १५ दिवस मनाई

नाशिक (प्रतिनिधी): नवरात्रोत्सवात कायदा व सुव्यवस्थेसाठी दि. ६ ते २० या पंधरा दिवसांच्या कालावधीत मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. याकाळात मोर्चे, निर्दर्शने, आंदोलने करण्यास मनाई असणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध मोर्चे, आंदोलने निघत आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये आजपासून (दि. १२ मार्च) ‘कृषी कुंभ’ प्रदर्शन

त्यात सण-उत्सवांचे दिवस असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. या कालावधीत शस्त्र बाळगणे, प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करणे, घोषणा देणे, सार्वजनिक ठिकाणी विनापरवानगी वाद्य वाजवणे, वाहनांवर झेंडे लावून फिरण्यास सक्त मनाई असणार आहे. तसेच पाचपेक्षा जास्त जमाव जमविण्यास पोलिस आयुक्तांची परवानगी आवश्यक राहणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790