नाशिक (प्रतिनिधी): जागेवरून सुरू असलेल्या वादाची कुरापत काढून लहान भावाने मोठ्या भावाला लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना जेलरोड येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी केशव पांडुरंग सांगळे (वय ५५, रा. महालक्ष्मीनगर, जेलरोड, नाशिक) व आरोपी प्रकाश पांडुरंग सांगळे (वय ५३, रा. पार्कसाईड, बळी मंदिराजवळ, आडगाव) हे दोघे भाऊ आहेत. फिर्यादी हे ड्युटीवरून घरी जात होते. त्यावेळी त्यांचा भाऊ प्रकाश याने चारचाकी वाहनातून आवाज देऊन थांबविले. त्यानंतर फिर्यादी थांबले असता संशयित प्रकाश याने छत्रपती संभाजीनगर रोडवरील जय गुरुदत्त लॉन्सच्या जागेवरून सुरू असलेल्या वादाची कुरापत काढली.
त्याच वेळी संशयित आरोपी प्रकाश याने गाडीतील लोखंडी रॉड घेऊन मोठ्या भावाला मारहाण केली. यात ते जखमी झाले. हा प्रकार काल (दि. ३) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास जेलरोड येथे घडला. या प्रकरणी प्रकाश सांगळे याच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार कुन्हाडे करीत आहेत. (नाशिकरोड पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ५२२/२०२४)
![]()


