नाशिक: कालिकामातेचे २४ तास तर भद्रकाली देवी मंदिरात सकाळी ६ पासून दर्शन !

नाशिक (प्रतिनिधी): शहरात आजपासून (दि. ३) नवरात्रोत्सवाचा उत्साह अनुभवायला मिळणार आहे. ग्रामदैवत असलेले श्री भद्रकाली देवी मंदिर सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुले राहील.

नवरात्रोत्सवात श्री कालिकामाता मंदिर गुरुवारी पहाटे ३ वाजेपासून २४ तास आणि देवळाली कॅम्पच्या रेस्ट कॅम्परोडचे रेणुकादेवी मंदिर पहाटे ३ पासून रात्री १२ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले राहील.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 10 ऑगस्ट रोजी आयोजन

विशेष म्हणजे, यंदा भद्रकाली मंदिरात लावलेले क्यूआर कोड स्कॅन करून भाविकांना लाइव्ह दर्शन घेता येईल. कालिकामाता मंदिर देवस्थानने भाविकांचा दोन कोटींचा सामूहिक विमा काढला असून वॉटरप्रुफ मंडपही उभारला आहे. भाविकांना सर्वच मंदिरांत किमान अर्धा तास ते जास्तीत जास्त एक तासात दर्शन होईल अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. सर्व देवी मंदिरांत नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790