नाशिक: एकतर्फी प्रेमातून घरात घुसून अल्पवयीन मुलीस जाळण्याची धमकी

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): एकतर्फी प्रेमातून घरात घुसून अल्पवयीन मुलीस जाळण्याची धमकी देणा-या तरूणास पोलिसांनी गजाआड केले आहे. काही महिन्यांपासून सदर युवक छेड काढत होता मात्र मुलीच्या तक्रारीनंतरही कुटूबियांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. परंतू त्याची मजल वाढल्याने पोलीसांना पाचारण करीत कुटुंबियांनी त्याची रवानगी थेट पोलीस ठाण्यात केली असून, याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: एसटी व ट्रकचा अपघात; दोन्ही चालक ठार; २ जण गंभीर जखमी

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिषेक छगन काळबंडे (१८) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. औद्योगीक वसाहतीत राहणा-या पीडितेच्या आईने याबाबत फिर्याद दिली आहे. संशयित गेल्या काही महिन्यांपासून १४ वर्षीय पीडितेची छेड काढत होता. अनेक वेळा त्याने पीडितेची वाट अडवित प्रेमाची मागणी केली परंतू मुलीने त्यास जुमानले नाही. काही दिवसांपूर्वी पुन्हा गाठून त्याने तू प्रेमास तयार झाली नाही तर तुझ्या कुटुंबियास जीवे ठार मारेल अशी धमकी दिल्याने भेदरलेल्या मुलीने आपबिती आपल्या कुटुंबियांकडे कथन केली होती. परंतू दुर्लक्ष करण्यास सांगून कुटुंबियाने तिची समजूत काढली होती.

हे ही वाचा:  नाशिक जिल्हा प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज; अशी आहे तयारी...

सोमवारी (दि.१६) सायंकाळी संशयिताने मुलीचे घर गाठून थेट कुटुंबियांनाच मुलीस जाळून टाकण्याची धमकी दिल्याने हा प्रकार पोलासीत पोहचला असून पीडितेच्या आईसह आजीआजोबा आणि भाऊ घरात असतांना त्याने बेकायदा घरात शिरून मी अभिषेक काळबंडे असून तुमच्या मुलीवर प्रेम करतो. तिने जर माझ्याशी प्रेम केले नाही तर मी तिला जाळून टाकेन अशी धमकी दिली. याच वेळी मुलगी घरी आली. मुलीने हा युवक नेहमी त्रास देत असल्याचे सांगितल्याने कुटुंबियांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधत पोलीसांना पाचारण करून संशयितास पोलीसांच्या स्वाधिन केले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक उंडे करीत आहेत. (अंबड पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ६१३/२०२४)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790