नाशिक: फ्लॅट घेण्यासाठी २० लाख रुपये आणत नसल्याने विवाहितेचा छळ

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): फ्लॅट घेण्यासाठी माहेरून २० लाख रुपये आणले नाहीत म्हणून कुरापत काढून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  आमदार राहुल ढिकलेंच्या पत्नीचे निधन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले ढिकले कुटूबियांचे सांत्वन

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी विवाहिता ही जय भवानी रोड परिसरात राहते. दि. १० फेब्रुवारी २०२२ ते दि. ९ सप्टेंबर २०२३ या कालावधीत सासरी नांदत होती. त्यावेळी पतीसह सासरच्या दहा जणांनी संगनमत करून फ्लॅट घेण्यासाठी वडिलांकडून २० लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेकडे तगादा लावला; मात्र विवाहितेने हे पैसे आणले नाहीत म्हणून तिच्याशी नेहमी वाद घालून तिला मारहाण करून शिवीगाळ करून धमकी देऊन अपमानास्पद वागणूक दिली, तसेच तिचा शारीरिक व मानसिक छळ करून लग्नात आईवडिलांनी दिलेले स्त्रीधन काढून घेत विवाहितेला नांदविण्यास नकार दिला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक महानगरपालिका प्रभाग समिती सभापतिपदांची निवडणूक 30 एप्रिलला

वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून अखेर विवाहितेने उपनगर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या दहा जणांविरुद्ध छळवणुकीची फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार घेगडमल करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790