नाशिक: सायंकाळनंतर सिटीलिंक बस मार्गात बदल; देखावे बघण्यास गर्दी वाढत असल्याने निर्णय

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): गणेशोत्सवानिमित्त देखावे पाहण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी वाढत असल्याने त्याअनुषंगाने सिटीलिंक बसच्या मार्गात सायंकाळनंतर बदल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

शहरात विविध ठिकाणी मुख्य रस्त्यांच्या शेजारी सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळातर्फे देखावे साकारण्यात आले आहे. विविध संदेश देणारे आकर्षक देखावे बघण्यासाठी नाशिककारांची गर्दी होत आहे. शनिवार व रविवार व पुढे दोन शासकीय सुटी असल्याने मोठ्या प्रमाणात देखावे पाहण्यासाठी गर्दी होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन वाहतूक कोंडी व अनुचित घटना काढण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून मुख्य रस्ते वाहतुकीकरिता बंद करण्यात आली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: खाजगी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक जण जखमी

परिणामी सिटीलिंक बसच्या मार्गातदेखील बदल करण्यात आले आहे. पोलिस प्रशासनाच्या सूचनेनुसार नाशिक रोड येथून पंचवटी, सातपूरकडे जाणाऱ्‍या बस या द्वारका सर्कल, सारडा सर्कल, गडकरी सिग्नल, चांडक सर्कल, जुना सीबीएस सिग्नल येथून जुना गंगापूर नाका सिग्नल, चोपडा लॉन्स मार्गे पंचवटीकडे जातील. तसेच दिंडोरी नाका (निमाणी) येथून सुटणाऱ्‍या बस काट्या मारुती सिग्नल, संतोष टी- पॉइंट, कन्नमवार पूल, द्वारका सर्कलमार्गे नाशिक, नाशिक रोड, अंबड, सातपूर व अन्य ठिकाणी मार्गस्थ होतील.

हे ही वाचा:  बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी तर दहावीची २१ फेब्रुवारीपासून

विसर्जनाच्या दिवशी बदल: अनंत चतुर्दशीच्या दिवशी मंगळवारी (ता. १७) पर्यंत दररोज केवळ सायंकाळी ६ ते रात्री बारापर्यंतच लागू असतील. त्याचप्रमाणे पोलिस प्रशासनाकडून ऐनवेळी देण्यात येणाऱ्‍या सूचनेनुसार बसच्या मार्गात ऐनवेळीदेखील बदल होवू शकतात याची प्रवाशांनी नोंद घ्यावी. त्यामुळे प्रवासादरम्यान प्रवाशांनी सिटीलिंकला सहकार्य करण्याचे आवाहन नाशिक महानगर परिवहन महामंडळ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790