नाशिक शहर सायबर पोलिसांचा इशारा; ‘ब्लुस्नार्फिंग’ पासून सावधान!

नाशिक: सायबर गुन्हेगार नवनवीन क्लृप्त्या शोधून ऑनलाईन गंडा घालण्याचा प्रयत्न करत असतात. सध्या सायबर गुन्हेगार ब्लुस्नार्फिंगच्या माध्यमातून तुमचा मोबाईल हॅक करून काहीही करू शकतात. त्याबाबत शहर सायबर पोलिसांनी सावधगिरीचा इशारा देतानाच सुरक्षात्मक उपाययोजना करण्याचेही आवाहन केले आहे.

मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन आर्थिक व्यवहार करणे जसे सोपे झाले आहे. तसेच, ते करीत असताना सुरक्षात्मक उपाययोजना नसतील तर धोक्याचेही ठरू शकते. अलिकडे शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून जादा परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधींचा गंडा घातला जातो. विशेषत: सायबर भामट्यांच्या या जाळ्यात सुशिक्षित, डॉक्टर, व्यावसायिक गंडले जात आहेत. आर्थिक फसवणूक करण्यासाठी सायबर भामटे नवनवीन क्लृप्त्या शोधत असतात.

हे ही वाचा:  बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी तर दहावीची २१ फेब्रुवारीपासून

आता ‘ब्लुस्नार्फिंग’च्या (Bluesnarfing Attack) माध्यमातून सायबर भामटे गंडा घालत आहे. मोबाईलमधील ब्लुटूथचा वापर यासाठी केला जातो. यापासून सावधगिरी बाळगण्यासाठी आपल्या मोबाईलमधील ब्लुटूथचे पासकोड क्लीष्ठ असावा, जेणे करून सायबर भामट्याला तो हॅक करता येणे शक्य होणार नाही. तसेच, मोबाईलचे सॉफ्टवेअर अद्ययावत करावे, वापरत नसाल तेव्हा ब्लुटूथ बंद ठेवावा यासह मोबाईलचा वापर करीत असताना अनोळखी व्यक्तींची लिंक, ब्लुटूथचा वापर टाळावा असेही आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: थंडीचा कडाका वाढला; पारा १२.४ अंशांपर्यंत घसरला

अशी घ्या काळजी: सोपा पीन क्रमांक न वापरता क्लीष्ट पीन क्रमांक वापरावा, मोबाईलच्या ब्लुटूथचा पासकोड हॅकरला ओळखता येऊ नये असा वापरावा, मोबाईलचे ब्लुटूथ वापरात नसाल तर, तो बंद ठेवावा, मोबाईलचे सॉफ्टवेअर वारंवार अपडेट करून घ्यावे, अनोळखी व्यक्तींकडून ब्लुटूथ पेअरिंग करू नये, देऊ नये तसेच अनोळखी लिंक ओपन करू नये.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790