नाशिक (प्रतिनिधी): एका वाहनातून गुजरात राज्यातूनमहाराष्ट्राच्या हद्दीत येत – असलेला जवळपास १४ लाख ५२ हजारांचा गुटखा व वाहन पोलिसांनी पेठ चेक नाक्यावर ताब्यात घेतले असून संशयित मात्र फरार झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, – गुरुवारी (दि. २९) रात्री आठच्या दरम्यान पेठ राष्ट्रीय महामार्गावरील चेक नाक्यावर गुजरातकडून नाशिककडे येणाऱ्या एका वाहनाची पोलिसांनी तपासणी केली असता त्यामध्ये विमल कंपनीचा पानमसाला व तंबाखू असा १४ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल व पिकअप जीप (एमएच १५ जीटी २७०८) हे वाहन (किंमत ४ लाख रुपये) असा एकूण १८ लाख ५२ हजार १५२ रुपयांचा मुद्देमाल पकडण्यात आला.
मात्र तस्करांनी अंधाराचा फायदा घेत वाहन सोडून पळ काढला. याबाबत पेठ पोलिसांत हवालदार भुसारे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक द्वारकानाथ गोंदके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पाटील, हवालदार भुसारे, पवार अधिक तपास करीत आहेत.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790