नाशिक (प्रतिनिधी): लघुउद्योग भारती नाशिक शाखेतर्फे उद्योगवर्धन या उपक्रमांतर्गत लघुउद्योजकांसाठी ‘जीएसटी फॉर एमएसएमइ समस्या व समाधान’ या विषयावर गुरुवारी (दि. २९) चर्चासत्र होणार आहे. त्र्यंबकरोड येथील आबीआयएस हॉटेल येथे हे चर्चासत्र सायंकाळी ५ वाजता होणार आहे. चर्चासत्रात कर व्यवसायातील तज्ज्ञ रवींद्र देवधर, दीपक जोशी हे मार्गदर्शन करतील. कार्यक्रमाला संबंधितांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790