नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): कसारा येथे लोकलच्या मोटरमनच्या केबिनमध्ये प्रवेश करून रिल्स काढणाऱ्या नाशिकच्या दोन तरुणांना रेल्वे सुरक्षा दलाने ताब्यात घेतले. नाशिक येथील राजा येरवाल (२०) आणि रितेश जाधव (१८) यातील एकाने २५ जुलैला कसारा स्थानकात प्लॅटफॉर्म ४ वर उभ्या असलेल्या लोकल क्रमांक ९५४१० च्या मोटरमनच्या केबिनमध्ये प्रवेश केला आणि दुसऱ्या आरोपीने चित्रीकरण केले. त्यानंतर तो सोशल मीडियावरही प्रसिद्ध केला होता.
मोटरमनच्या कॅबिनमध्ये प्रवेश करणे हा गुन्हा असल्याने मध्य रेल्वेच्या सुरक्षा पथकाने सायबर सेलच्या सहकायनि या दोघांना नाशिक येथून शनिवार (दि. ८) पकडले. महिन्याभरापूर्वीही उत्तर रेल्वेच्या गुलजार शेखने रिल्स तयार करण्यासाठी रेल्वे रुळांशी छेडछाड केल्याप्रकरणी अटक केली होती. यामुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आणणारी, रेल्वेच्या कामकाजात अडथळा आणणारी आणि रेल्वे कायदे, नियमांचे उल्लंघन करणारी कृत्ये असल्याने रेल्वे सुरक्षा दलाकडून कडक कारवाई करण्यात आली.