नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): बांधकामाच्या ठिकाणी खड्ड्यातील पाण्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याप्रकरणी बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत विनोद एकनाथ सोनटक्के (रा. श्रमिकनगर, सातपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की त्यांचा मुलगा प्रणव सोनटक्के (वय १४) व त्याचा मित्र अंकुश किरण गाडे (वय १४) हे दोघे श्रमिकनगर, सातपूर येथे सुरू असलेल्या मुंदडा कन्स्ट्रक्शन्सच्या बांधकामाच्या साईटवर खड्डा करण्यात आला आहे.
या खड्ड्यातील पाण्यात ही मुले बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या खड्ड्यात पाणी साठले होते. या खड्याबाबत कोणतीही सुरक्षितता न बाळगता निष्काळजीपणा केला. त्यामुळेच या मुलांचा मृत्यू झाल्याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात मुंदडा कन्स्ट्रक्शन्स व संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (सातपूर पोलीस ठाणे, गुन्हा रजिस्टर क्रमांक: १९७/२०२४)