नाशिक: लोखंडी रॉडने वार करत तरुणाचा भररस्त्यात खून

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): जमिनीच्या वादातून 2 युवकांनी प्रमोद वाघ (४०) यांच्यावर लोखंडी रॉडने (टॉमी) सपासप वार करत ठार केल्याची घटना शुक्रवारी (दि. २) सायंकाळी ५ वाजता सिन्नर फाटा येथे घडला. हल्लेखोर फरार झाले आहेत. नाशिकरोड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  निफाड ड्राय पोर्ट ठरणार नाशिकसाठी मोठे मल्टी-मॉडेल लॉजिस्टिक्स हब; कृषी निर्यात, उद्योग आणि रोजगाराला मिळणार मोठी चालना

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रमोद वाघ हे सर्व्हिसरोडने दुचाकीने सिन्नर फाट्याकडे जात असताना संशयित योगेश पगारे व त्याच्या मित्रांनी वाघ यांना अडवले. एकजण रस्त्यावर त्याच्याशी बोलत असताना दुसऱ्याने शेजारील पंक्चरच्या दुकानातून लोखंडी रॉड (टॉमी) उचलून वाघवर सपासप वार केले. नागरिकांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले असता मृत्यू झाला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यास 'रेड अलर्ट'; अतिमुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क

पाळत ठेवून हल्ला केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस संशयितांचा माग काढत आहेत. याप्रकरणी संशयित योगेश रामदास पगारे आणि सद्दाम मलिक या दोघांविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790