नाशिकमध्ये तीन दिवस मध्यम पावसाचा अंदाज

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): गुजरात ते केरळ किनारपट्टीलगत हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे बुधवारपासून (दि.१७) तीन दिवस कोकणासह घाटमाथ्यावर अतिजोरदार तर नाशिकसह उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात मध्यम पावसाचा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तवला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: घरफोड्या करून कारमध्येच मुक्काम; मुंबईच्या टोळीला नाशिक पोलिसांकडून अटक

रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे या जिल्ह्यांत अतिजोरदार तर नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, जालना, परभणी, नांदेड, बीड या जिल्ह्यांत मध्यम पावसाचा अंदाज आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790