नाशिक: अवघ्या 15 मिनिटांत दोघींच्या सोन्याच्या पोती खेचल्या

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): म्हसरुळ-मखमलाबाद लिंकरोडवर सोमवारी (ता. १५) रात्री अवघ्या १५ मिनिटांमध्ये दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने खेचून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी म्हसरूळ पोलीसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक पकडली; १२.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त

दरम्यान, या लिंकरोडवर सातत्याने सोनसाखळी चोरट्यांकडून पादचारी महिलांना लक्ष्य केले जात असून, पोलिसांकडून मात्र या चोरट्यांविरोधात कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे.

सुवर्णा प्रमोद कुर्हे (रा. रामकृष्णनगर, मखमलाबाद रोड) या सोमवारी (ता. १५) रात्री आठ वाजेच्या सुमारास घरातून पूजेसाठी मंदिराकडे पायी जात होत्या. श्रेया रेसीडेन्सीसमोर असतानाच पाठीमागून काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या संशयिताने त्यांच्या गळ्यातील १५ हजारांची सोन्याची पोत खेचून नेली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: घरफोड्या करून कारमध्येच मुक्काम; मुंबईच्या टोळीला नाशिक पोलिसांकडून अटक

त्यानंतर अवघ्या १५ मिनिटांनीच हर्षला नेमाडे (रा. पिंगळे कॉलनी) या मंदिरातून दर्शन घेऊन घरी परत आल्या असता, घरासमोरच पाठीमागील त्याच काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या संशयिताने त्यांच्या गळ्यातील २५ हजारांची सोन्याची पोत खेचून नेली. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: म्हसरुळला एसटी बस- दुचाकीचा अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

दरम्यान, या म्हसरुळ-मखमलाबाद रोडवर सातत्याने सोनसाखळी खेचून नेण्याच्या घटना घडत आहे. एकाच ठिकाणी होत असलेल्या घटना रोखण्यासाठी मात्र पोलिसांकडून कोणतीही ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. त्यामुळे परिसरातील नागरिक व महिलांमध्ये तीव्र नाराजी आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790