नाशिक: म्हसरुळला एसटी बस- दुचाकीचा अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

नाशिक। दि. १३ सप्टेंबर २०२६: म्हसरूळ परिसरातील दिंडोरी रोडवर रविवारी (दि. १३) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात अज्ञात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. नाशिकहून कळवणच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसखाली दुचाकी आल्याने हा अपघात झाला. मृताची ओळख अद्याप पटलेली नाही.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, म्हसरूळ येथील गजपंथ कॉलनीसमोरील बजाज शोरूमजवळून एसटी बस (एमएच १४ एमएच १४७२) कळवणच्या दिशेने जात होती. त्याच दिशेने एक दुचाकी (एमएच १५ जेटी ९३३८) प्रवास करत होती. शोरूमजवळ दोन्ही वाहनांमध्ये अचानक कट लागला अथवा दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले असावे, अशी प्राथमिक शक्यता आहे. त्यानंतर दुचाकी एसटी बसच्या चाकाखाली आली. या अपघातात दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जि.प. नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांना राज्यस्तरीय एस. एस. गडकरी पुरस्कार

घटनेची माहिती मिळताच म्हसरूळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली आहेत. दुचाकीच्या क्रमांकासह घटनास्थळी आढळलेल्या कागदपत्रांच्या आधारे मृताची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अपघातामुळे दिंडोरी रोडवर वाहतूक कोंडी:
सायंकाळच्या वेळी हा अपघात झाल्याने घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली. अपघाताचे दृश्य पाहण्यासाठी नागरिक थांबल्याने दिंडोरी रोडवर काही काळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि वाहतुकीचा खोळंबा झाला. पोलिसांनी गर्दी हटवून तसेच अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात पुढील नोंद व तपासाची प्रक्रिया सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790